केक कापायला टाळाटाळ केल्यामुळे आमदार बंधूच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला
केक कापायला टाळाटाळ केल्यामुळे आमदार बंधूच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला Saam Tv
मुंबई/पुणे

केक कापायला टाळाटाळ केल्यामुळे आमदार बंधूच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

गोपाल मोटघरे

पुणे : चिंचवड विधानसभाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणाला प्राथमिक पोलीस तपासात एक नवं वळण लागल आहे. आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी आरोपी प्रद्युम्न किशोर भोसले यांचा वाढदिवसाचा केक कापण्यास टाळाटाळ केल्याने प्रदीप भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकून शंकर जगताप यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रद्युम्न भोसले यांनी आपले वर्गमित्र सॅमसंग अमेट आणि देवेंद्र बिडलान यांच्या मदतीने यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचं ऑफीस तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केला होता. असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

त्याच धर्तीवर शंकर जगताप यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी प्रद्युमन भोसले यांनी तन्मय रामचंद्र मदने, विक्रम विजय जवळकर, सॅमसंग अमेट, देवेंद्र बिडलान आणि इतर दोन अल्पवयीन बालगुन्हेगार यांच्या मदतीने शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकून दहशत निर्माण करणे त्यानंतर त्यांच्या विरोधकांना धमकावून त्यांना या पेट्रोल बॉम्ब हल्ला अडकवण्याची धमकी दाखवून खंडणी उकळण्याचा आरोपीचा कट होता असे पिंपरी-चिंचवडच्या आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT