Mumbai's Reserved Water News: मुंबईत मोठं जलसंकट निर्माण होऊ शकतं. मुंबईला सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांमध्ये अवघे ४५ दिवस पुरेल, इतकं पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचाही ताण वाढला आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता मुंबईलाही जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. मुंबईत नाशिक, ठाणे, भिवंडी आदी भागातील सात तलावांमधून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ १५.२ टक्के साठा शिल्लक आहे, जे सुमारे २.४ लाख दशलक्ष लिटर इतके आहे. यातील एक टक्का पाणी मुंबईत तीन दिवसाआड वापरले जाते. गेल्या वर्षी १५ जून २०२२ रोजी हा आकडा १२.२४ टक्के होता. तर २०२१ मध्ये याच तारखेला हा साठा १२.७५ टक्के होता. (Latest Marathi News)
मुंबईला वर्षभरात १४,४७,३६.३ दशलक्ष लिटर पाणी लागते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली. ऑक्टोबरअखेर धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. (Mumbai News)
मात्र यंदा मान्सूनचे आगमन होण्यास उशीर झाल्याने चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. त्याचबरोबर यंदाच्या कडाक्याच्या उन्हामुळे अनेक जलाशयांमध्ये झपाट्याने पाणी आटू लागले आहे. (Latest Mumbai News)
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) मुंबईतील शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या आहेत की, ''चक्रीवादळ बिपरजॉयमुळे महाराष्ट्रात मान्सून येण्यास उशीर होणार आहे. आता १८ ते २१ जून दरम्यान मान्सून येण्याचे संकेत आहेत.'' (Mumbai News Today)
दरम्यान, मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मुंबई शहर केवळ जलाशयांमध्ये साठलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या पाणीकपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाच्या आधारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाऊ शकते.