Mumbai BMC Plans Housing Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाप्रमाणेच BMC काढणार घरांसाठी लॉटरी; प्राईम लोकेशनवर स्वस्तात मस्त घरे मिळणार

Mumbai BMC Plans Housing Lottery: BMC १८४ घरांसाठी लॉटरी काढणार. या लॉटरीतून बीएमसीला अंदाजे १५० कोटीचं महसूल मिळणार. लॉटरी प्रक्रियेद्वारे घरांचे वाटप होणार.

Bhagyashree Kamble

  • मुंबईकरांसाठी खूशखबर!

  • BMC काढणार घरांसाठी लॉटरी

  • प्राईम लोकेशन घरे मिळणार

सामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कायम सज्ज असते. पण आता बीएमसीकडूनही सामान्य व्यक्तींच्या घराच्या स्वप्नाला हातभार लागणार आहे. नवीन विकास आराखड्यानुसार, (डीपी) मोठ्या भूखंडांवर बांधकाम व्यावसायिकांकडून मिळणारी घरे बीएमसी लॉटरी प्रक्रियेद्वारे विकणार आहे. या निर्णयामुळे बीएमसीला चांगला महसूल मिळणार आहे. लवकरच १८४ घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू होणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरांच्या विक्रीतून जवळपास १५० कोटी रूपयांचे उत्पन्न तयार होईल. ही घरे रेडी रेकनर किंमतीपेक्षा किंचित जास्त दराने विकली जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या बीएमसीकडून सुमारे ११० घरांचे ठिकाण निश्चित झाले आहे. तर, उर्वरित घरांचे ठिकाणही लवकरच निश्चित केले जाईल. २०१८ साली मंजूर झालेल्या डीपीनंतर या भूखंडांवर उभारलेलया इमारती आता तयार असून, नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'मुंबईत प्रत्येकाला घर मिळावे, या स्वप्नाच्या दिशेनं हा महत्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांतच आणखी ३०० ते ४०० घरे उपलब्ध होतील. ही घरे लॉटरीतून दिली जातील', अशी माहिती त्यांनी दिली.

लॉटरी प्रक्रिया नेमकी कशी असेल?

बीएमसीनं म्हाडाप्रमाणेच लॉटरी काढण्याची पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी यानंतरच लॉटरी काढता येईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ल़ॉटरी प्रक्रियेसाठी म्हाडाशी संपर्क साधण्याचा विचार सुरू आहे. कारण म्हाडाकडे आधीपासूनच संपूर्ण लॉटरी प्रणाली आहे. बीएमसीला नव्यानं विकसीत करण्याऐवजी सहकार्याचा पर्याय अधिक सोपा ठरेल', असं त्यांनी सांगितलं.

निधीची गरज

मागील काही वर्षांत बीएमसीनं अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची आखणी केली आहे. सध्या बीएमसीकडे ७० हजार कोटी निधी आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल २ कोटीहून अधिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे बीएमसी महसूल वाढवण्यासाठी नव्या मार्गांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलन,17 जणांचा मृत्यू

Pune Drink And Drive : पुण्यात अपघाताचा थरार! मद्यधुंद चालकानं दुचाकीला दिली धडक, दुभाजकावर कार चढवली

SCROLL FOR NEXT