BJP MLA Mihir Kotecha Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांवर कोट्यवधींची उधळण; ACBकडून चौकशी करण्यासाठी भाजप आमदाराचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

BMC Latest News: कोरोना काळात बीएमसी अधिकाऱ्यांच्या राहण्या-खाण्यावर कोट्यवधींची उधळण केला असल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेजा यांनी केला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

रुपाली बडवे, मुंबई

Mumbai Politics News: कोरोना काळात मुंबई महापालिकेतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मुंबई महापालिकेने हॉटेल्स बुक केले होते. अत्यावश्यक सेवेतील या अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि सरकारी कामात अडथळा येऊन म्हणून पालिकेतर्फे मुंबईतच पालिका मुख्यालयापासून जवळ पालिका अधिकाऱ्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली होती. आता याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. (Corona Latest News)

कोरोना काळात बीएमसी अधिकाऱ्यांच्या राहण्या-खाण्यावर कोट्यवधींची उधळण केला असल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेजा यांनी केली आहे.

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या बीएमसी (Brihanmumbai Municipal Corporation) अधिकारी आणि कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणाजवळ राहण्यासाठी पंचतारांकित आणि इतर हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले होते. २४ वॉर्डातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्या-खाण्यावर तब्बल ३४ कोटी ६१ लाख ११ हजार ५३५ रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. कॅगकडून चौकशी होत असताना हा ३४ कोटींचा प्रस्ताव प्रशासक म्हणून आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला होता. (Latest Marathi News)

शिवाय या हॉटेल्सना जर प्रॉपर्टी टॅक्स त्या काळात माफ करण्यात आला तर एवढा खर्च कसा झाला? असा प्रश्न भाजप आमदार मिहीर कोटेजा यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभाकडून चौकशी करण्यात यावी तसेच मुंबईकरांचेकरांचे इतके पैसे कसे खर्च केले याची माहिती द्यावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलं आहे.

असा होता प्रस्ताव आणि प्रती खोलीचे दर

प्रत्येक हॉटेलमधील खोलीत दोन कर्मचारी राहतील

फाईव्ह स्टार हॉटेल प्रती खोली - दोन हजारअधिक कर

फोर स्टार हॉटेल - १,५०० - अधिक कर

थ्री स्टार हॉटेल - एक हजार रुपये - अधिक कर

नॉन स्टार हॉटेल - ५०९ रुपये अधिक कर

एकूण झालेला खर्च - ३४ कोटी ६१ लाख १२ हजार ५३५

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT