मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे खाते उघडले
तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांचा विजय
ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव
महायुती सध्या मुंबईत आघाडीवर
मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं खोललं. भाजपचे उमेदवार तेजस्वी घोसाळकर आणि नवनाथ बन हे विजयी झाले आहेत. भाजपच्या तेजस्वी घोसाळकर दहिससच्या प्रभाग क्रमांक २ मधून विजयी झाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा त्यांनी पराभव केला. तर मानखुर्दमधून भाजपचे उमेदार नवनाथ बन हे विजयी झाले. नवनाथ बन हे प्रभाग क्रमांक १३५ मधून विजयी झाले. दोन्ही उमेदवार विजयी होताच एकच जल्लोष करण्यात आला.
मुंबई महानगर पालिका निवडणूक निकालाच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार मुंबईतील २२७ वॉर्डपैकी ९० जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंची युती ७१ जागांवर आघाडीवर आहे. तर स्वबळाचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवलेला काँग्रेस पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. तर मुंबईत आतापर्यंत भाजपचे दोन आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी जाले आहेत.
मुंबई महानगर पालिकेमधील २२७ वॉर्डपैकी १७ वॉर्डमधील भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे २० उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूंनी युती करत मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती. शिवसेना ठाकरे गट ६२ जागांवर आघाडीवर आहे. मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.