आयुक्त भूषण गगरानी यांनी मुंबई महापालिकेचा 2025-26 या अर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ झाली. 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढलाय. गतवेळच्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.
अर्थसंकल्पात काय काय?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार आहे. झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर करण्यात आलाय. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता मुंबई महापालिका कर वसूल करणार आहे. यातून सुमारे 350 कोटी इतका महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मुंबईसाठी विशेष वातावरणीय बजेट सादर करण्यात आले. पर्यावरण खात्याकरता ११३ कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनाही आखल्या आहेत. राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन, वाघानंतर जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत.
मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी देण्यात येणार आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहेत. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत. काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.
अर्थसंकल्पात काय काय ?
आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७ हजार कोटींची तरतूद
शिक्षण सुविधा साठी - ४ हजार कोटींची तरतूद
बेस्ट उपक्रमासाठी १००० कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
पर्यावरण खात्यासाठी ११३ कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली. उर्वरित काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेणार आहे. टप्पा एक मधील 75 टक्के कामे आणि टप्पा दोन मधील 50% कामे जून 2025 पूर्वी पूर्ण करण्याची काम प्रस्तावित आहे, यामुळे पावसाळ्यातील खड्डे पडण्याचे समस्येचे प्रमाण कमी होईल असा महानगरपालिकेचा दावा आहे.
प्रकल्पबाधितांकरता सदनिका मिळणार आहेत. प्रभादेवी , भांडूप ,मुलुंड, जुहू , मालाड येथील एकूण ३२७८२ PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या सदनिका पुढील ३ ते ५ वर्षांमध्ये उपलब्ध होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.