Vanchit Congress Seat Sharing Crisis Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

Vanchit Congress Seat Sharing Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून काँग्रेस आणि वंचित आघाडीत झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या यामधील २१ जागा त्यांनी काँग्रेसला परत केल्या

Priya More

Summary:

  • मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितमधील जागावाटपाचा गोंधळ उघड

  • वंचितकडून १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाहीत

  • इच्छुक काँग्रेस उमेदवारांमध्ये तीव्र संताप

  • या निवडणुकीत ऐनवेळी आघाडी केल्याचा काँग्रेसला फटका

गिरीष कांबळे, मुंबई

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितमधील जागावाटपाचा गोंधळ आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसने वंचितला दिलेल्या ६२ जागांपैकी २१ जागा वंचितने ऐनवेळी परत केल्या. त्यापैकी ५ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. पण १६ जागांवर वंचितला उमेदवारच मिळाले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्ष बुचकळ्यात पडला. या नियोजित जागांच्या अभावामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अखेरच्या क्षणी काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली होती. काँग्रेसने वंचितला मुंबईत ६२ जागा दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण मिळालेल्या ६२ पैकी तब्बल २१ जागा काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या २१ जागांपैकी ५ जागांवर अखेरच्या क्षणी काँग्रेसने उमेदवार दिले असून १६ जागांवर उमेदवार मिळालेला नाही. जागा वाटपासंदर्भात अखेरच्या क्षणांपर्यंत झालेल्या या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या. काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची मोठी रांग असताना देखील वंचितला ६२ जागा देण्यात आल्यामुळे आणि काही जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

घडलं असं की, मुंबईमध्ये वंचितने काँग्रेसला दणका दिला. काँग्रेसने वंचितला जागा सोडूनही १६ जागी वंचितला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे टेन्शन वाढले. जागावाटपावरून झालेल्या या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांचा संताप पाहायला मिळाला. काँग्रेसने वंचितसाठी ६२ जागा सोडल्या होत्या. ६२ पैकी २१ जागांवर वंचितकडे उमेदवार नसल्याने त्यांनी या जागा काँग्रेसला परत केल्या. या २१ जागांपैकी ५ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले पण उर्वरित १६ जागांवर उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या होत्या. त्यापैकी ६, ११, १२, १३, १४, १५, २१, ३०, ४६, ७३, ८०, ८४, ८५, १०८, ११७, १५३, १७७, १८२, १९५, १९८, २०७ या प्रभागांतील जागा वंचितने काँग्रेसला परत दिल्या होत्या. अधिकृत उमेदवार देण्यासाठी मित्रपक्ष वंचित असमर्थ ठरल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांनी मतदारसंघ घेतले त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. उमेदवार नव्हते तर त्यांनी आमच्याशी संपर्क करणेचे गरजेचे असल्याचे म्हणत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केली.

काँग्रेस- वंचित आघाडीतील मुंबईतील उमेदवारांची संख्या -

काँग्रेस - १६७ उमेदवार

रासप - ६ उमेदवार

सिपीआय - १ उमेदवार

वंचित- ४६ उमेदवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पनवेल आणि नवी मुंबईच्या फार्म हाऊस वर पोलिसांची नजर

Jaggery-peanuts Benefits: हिवाळ्यात गुळ-शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Gold Price : सोनं प्रति तोळा ५८००० रूपयांनी वाढले, वाचा वर्षभरात गोल्ड रेट कसे बदलले

Suniel Shetty: सुशांतनंतर, कार्तिक आर्यनविरुद्ध बॉलिवूडचा काही अजेंडा आहे का? सुनील शेट्टीने दिला इशारा

SCROLL FOR NEXT