BMC Elections: भाजपकडून अभिनेत्रीला तिकीट मिळताच युतीत बिनसलं; शिंदे गटाच्या नेत्याची बंडखोरी

BMC Elections: भाजपने प्रभाग २५ मध्ये अभिनेत्री निशा परुळेकर यांना तिकीट दिल्याने महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. निशा परुळेकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या शेखर शेरे यांनी बंडकोरी केलीय.
BMC Elections
BJP candidate Nisha Parulekar after receiving the AB form for Mumbai civic elections.
Published On
Summary
  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर

  • वॉर्ड क्रमांक २५ भाजपकडे गेल्याने शिवसेना नेते नाराज

  • अभिनेत्री निशा परुळेकर यांना भाजपकडून तिकीट

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झालीय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ९० जागा मिळाल्या आहेत. तर भाजप १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरी केली. वॉर्ड क्रमांक २५ मधील चित्रही सारखेच ठरले.

BMC Elections
Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

भाजपकडे जागा गेल्याने शिवसेना नेत्यानं बंडखोरी केली आहे. भाजपनं या ठिकाणी अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र यामुळं नाराज झालेल्या शिवेसनेच्या शेखर शेरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. यामुळं निशा परुळेकर यांच्या अडचणी वाढल्यात.

BMC Elections
Panvel Corporation Election: पनवेल महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर, जाणून घ्या कोण किती जागा लढवणार?

निशा परुळेकरांविरोधात सेनेच्या शेखर शेरेंची बंडखोरी

मागाठाणे विधानसभेमध्ये शिवसेना भाजप आमने-सामने आलेत. भाजपकडून वॉर्ड क्रमांक २५ मधून निशा परुळेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. मात्र याच वॉर्डात शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शेखर शेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या शेखर शेरे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या परुळेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

BMC Elections
१० वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

कोण आहेत अभिनेत्री निशा परुळेकर?

अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्री निशा परुळेकर राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. भरत जाधव यांच्यासोबत ' सही रे सही' यासारख्या तुफान नाटकात त्यांनी काम केलंय. तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com