BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

BMC Election: महायुतीपाठोपाठ बंडखोरांनी ठाकरेंचंही टेन्शन वाढवलंय. मात्र बंडखोरांमुळे आदित्य ठाकरेंची बालेकिल्ल्यातच कशी कोंडी झालीय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
BMC Election:
Shiv Sena (UBT) workers protest after ticket denial in Worli ahead of BMC elections.saam tv
Published On

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभर महायुतीच्या इच्छुकांचा उद्रेक झालाय. कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात असंतोष व्यक्त केलाय.नाराजांच्या उद्रेकामुळे मुंबईत ठाकरेसेनेचीही डोकेदुखी वाढलीय. आणि त्याचा सगळ्यात दणका बसलाय तो आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात. उमेदवारी न मिळाल्यानं वरळीत ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी थेट राजीनाम्यापर्यंत पोहोचलीय. मात्र कोणत्या वॉर्डमध्ये हा उद्रेक झालाय. पाहूयात.

BMC Election:
डेडलाईन संपण्याच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार

वॉर्ड 139

ठाकरेसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबूरकरांच्या पत्नीला उमेदवारी

राजकारणात सक्रीय नसलेल्या पद्मजा चेंबूरकरांच्या उमेदवारीमुळे आकर्षिका बेकल पाटील आणि संगीता जगताप नाराज

वॉर्ड 193

वरळी कोळीवाड्यातून हेमांगी वरळीकरांना उमेदवारी

वरळीकरांच्या उमेदवारीमुळे सुर्यकांत कोळींचा राजीनामा

सुर्यकांत कोळी उमेदवारीसाठी इच्छूक

वॉर्ड 197

मनसेला जागा सोडल्यानं ठाकरेसेनेचे पदाधिकारी नाराज

पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

मनसेच्या उमेदवाराविरोधात काम करण्याची धमकी

खरंतर वरळी हा ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो.2017 मध्ये वरळीत शिवसेनेचे सर्वच नगरसेवक निवडून आले होते.. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुर्यकांत कोळींनी थेट मातोश्रीवर धाव घेतलीय. त्यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं मुंबई महापालिका राखण्याचा मार्ग सोपा झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता इच्छूकांच्या नाराजीमुळे भाजप आणि शिंदेसेनेच्या विरोधात लढण्यासोबतच बंडखोरांची बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान आदित्य ठाकरेंपुढं असणार आहे... त्यामुळे बंडखोरांची मनधरणीवर ठाकरेंच्या सत्तेचं समीकरण घडणार की बिघडणार हे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com