Rahata Municipal Election
Suspended Thackeray Sena leader Rajendra Pathare withdraws his nomination at the last moment in Rahata Municipal Electionsaam tv

डेडलाईन संपण्याच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार

Rahata Municipal Election: माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. माध्यमांश बोलताना राजेंद्र पठारे यांनी पुन्हा साधला बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.
Published on
Summary
  • हकालपट्टींनंतर पदाधिकाऱ्यांना झाले होते अश्रू अनावर

  • ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता AB फॉर्म चोरल्याचा आरोप

  • ठाकरे सेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज घेतले माघारी.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

अहिल्यानगरमधील राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. ठाकरे सेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी ऐनवेळी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत. पठारे यांनी पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्षही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली होती. पाठरे यांनी AB फॉर्म चोरल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता. त्यावर बोलताना पठारे म्हणाले यावर तीन तारखेनंतर उत्तर देईन. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी करणअयात आलीय. अर्ज भरल्यानंतर आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचं पठारे म्हणालेत.

Rahata Municipal Election
Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हकालपट्टींनंतर अश्रू अनावर पदाधिकाऱ्यांना झाले होते. ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी ठाकरे सेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या त्यानंतर पठारे यांनी नराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतले. तर नगरसेवक पदाचे अर्ज कायम ठेवलेत. दरम्यान पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरीही राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम आहेत.

उमेदवार राजेंद्र पठारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अपक्ष म्हणून नगरध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते, ते मागे घेतले आहेत. प्रभाग ५ मधून नगरध्यक्षपदाठी अर्ज केला होता. ही उमेदवारी मागे घेतलेली नाही. त्यानंतर सागर लुटे हे प्रभाग ७ मधून निवडणुकीत उभे आहेत. उज्वला होले यांची उमेदवारी देखील प्रभाग ८मधून आहे, तेही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

Rahata Municipal Election
Maharashtra Government: कर्मचाऱ्यांनो, आमदार-खासदारांशी कसं वागणार? शासनानं काढलं परिपत्रक

तर अर्ज चोरीचे आरोप तथ्यहीन आहेत, आरोप करणाऱ्यांना आपण तीन तारखेनंतर उत्तर देणार असल्याचं पठारे म्हणालेत. अपक्ष चिन्हामुळे वाद सुरू झालाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हाकलपट्टीची कारवाई झालीय. तर अपक्ष म्हणून दाखल करण्यात आलेली उमेदवारी ही काही कारणामुळे मागे घेण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com