

Summary -
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का
दत्ता बंडगर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपची ताकद वाढली
रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्वांनी केला पक्षप्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळाल आहे. अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्यने भाजपचे कमळ हाती घेतलं. धाराशिवचे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तर सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
धाराशिवमध्ये ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे. माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यासोबत जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उबाठा शिक्षकसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. हे प्रवेश म्हणजे घर वापसी असल्याचं राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. रमेश उर्फ बंडू शेठ कातुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी यमगर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राजमाने आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विक्रम माने, वैभव भानुसे, गणेश कातुरे, हिराप्पा यमगर, अविराज यादव, कैलास शेंडगे आणि वैभव खांडेकर या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.