Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान

Uddhav Thackeray: मनसे-शिवसेना युती होणार की नाही? याबाबत संभ्रम कायम आहे. मनसे मविआमध्ये जाणार नाही, असे राज ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान
Raj Thackeray saamtv
Published On

Summary -

  • मनसे मविआमध्ये जाणार नाही

  • संदीप देशपांडे यांचे स्पष्ट विधान

  • राज ठाकरे–उद्धव ठाकरे भेटींवरून झालेल्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम

  • काँग्रेस मनसेला सोबत न घेण्याच्या निर्णयावर ठाम

मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आगामी निवडणूक एकत्र लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सततच्या भेटीमुळे मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा अंदाज लावला जात आहे. पण अद्यापही दोन्ही नेत्यांकडून याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच इच्छा मनसे-शिवसेनेने एकत्र यावी ही आहे. पण निवडणुका जवळ आल्या तरी देखील याबाबत काहीच निर्णय झाला नाही. अशातच राज ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीने मोठं विधान केलं आहे. 'मनसे मविआमध्ये जाणार नाही', असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. आमच्या पक्षाचा निर्णय सन्माननीय राज ठाकरे घेतात,' असे सांगत संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी कल्याणमधील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी परप्रांतीयांच्या दादागिरीवर टीका केली. तर पुणे जमीन घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला.

Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान
Maharashtra Politics: मनसे–ठाकरे गट युतीला वेग; मनसेसाठी किती जागांचा प्रस्ताव? गणित आलं समोर|VIDEO

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आणि 'बूंद से गईं सो हौद से नहीं आती,' या म्हणीचा वापर करत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना मान देण्याच्या जीआरवर बोलताना, मान जबरदस्तीने मिळवता येत नाही, तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान
Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; सलील देशमुख यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत न घेण्याच्या निर्णयावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, 'मारहाणीची भाषा करणारे आमच्या सोबत नको. समविचारीची भाषा करणाऱ्यांना सोबत घेऊन जाणार.' वर्षा गायकवाड यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबतच राहणार की मनसेसोबत युती करणार याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान
Maharashtra Politics: अर्ज माघारी घे नाही तर..., भाजप उमेदवाराकडून काँग्रेसच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com