

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे विधान केले.
“मी आहे तोपर्यंत मोदी सत्तेत” असे वक्तव्य त्यांनी केले.
या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाची शक्यता.
भुषण अहिरे, साम प्रतिनिधी
'मी ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते. मी आहे तोपर्यंत मोदीजी सत्तेत आहे, असे मोठे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. आठवले यांच्या विधानामुळे वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा आपल्या विधानामुळे चर्चेत आलेत.
राज्यसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिक मोलाचा वाटा असल्याचं विधान आठवले यांनी केले होतं. आता त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत एक विधान केलं आहे, ज्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
'मी ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते. मी आहे तोपर्यंत मोदीजी सत्तेत आहे, असं मोठं विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयात सुवर्ण महोत्सव सोहळा तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला, त्यावेळी मंत्री आठवले नागरिकांशी संवाद साधत असताना आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे मोठे विधान केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी भाजप पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला, मात्र त्यामुळे देशभरातील लोकांनी विरोधकांना मते दिली, त्याचा फटका काही प्रमाणात बसला आणि काही जागा कमी आल्या, त्यात धुळ्यात सुध्दा भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांना पराभुत व्हावे लागले, परंतू मी तेव्हा सुध्दा सांगत होतो की संविधान बदलले जाणार नाही, संविधान बदलू शकतच नाही, कारण कोणाच्या बापाचा बाप आला तरी आमच्या बापाने तयार केलेले संविधान बदलू शकत नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.