BLACK MAGIC SCARE IN SHIRUR ANGANWADI CAMPUS CREATES PANIC AMONG PARENTS saam tv
मुंबई/पुणे

अंगणवाडी शाळेच्या आवारात भानामतीसदृश प्रकार; पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Black Magic Scare In Anganwadi Shirur Maharashtra: शिरूरमधील अंगणवाडी शाळेच्या आवारात भानामतीसदृश वस्तू आढळल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

रोहिदास घाडगे/सागर आव्हाड, साम टीव्ही

शिरूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या अंगणवाडीच्या आवारात भानामतीचा (जादूटोणा सदृश) प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीत शिक्षणासाठी येणारी लहान मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये या प्रकारामुळे अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अंगणवाडी शाळेच्या आवारात जादूटोणा किंवा भानामतीशी साधर्म्य असणाऱ्या वस्तू आढळल्याने परिसरात घबराट पसरली. घटनेचे गांभीर्य ओळखून शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधींनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नागरिक आणि पालकांची भेट घेतली. अंधश्रद्धा, भानामती किंवा जादूटोण्यासारख्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

शाळेच्या आवारात असा प्रकार आढळल्याने आम्ही खूप घाबरलो आहोत. चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी पालकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना किंवा अंधश्रद्धेला बळी पडू नये. परिसरात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. असे आवाहन शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले आहे.

भानामती किंवा जादूटोणा हा केवळ मानसिक भीती आणि गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे. पालकांनी अजिबात न घाबरता आपल्या मुलांना निर्भयपणे अंगणवाडीत पाठवावे. कोणत्याही अज्ञाताच्या खोडसाळपणाला बळी पडू नका. असे आवाहन अंध श्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या क्रांती पैठणकर यांनी केले आहे.

यासोबतच शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सुनीता पोटे, महिला व बालकल्याण सभापती आयेशा सय्यद, लोकजागृतीचे प्रमुख रवींद्र धनक, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या क्रांती पैठणकर आणि डॉ. वैशाली साखरे, लहुजी शक्ती सेनेचे विशाल जोगदंड, योगेश जामदार,स्थानिक कार्यकर्ते युवराज सोनार,गणेश गायकवाड, आशिष चव्हाण, हरीश अन्सारी या ठिकाणी भेट दिली.भानामातीसारख्या अफवांवर व जादूटोण्यावर विश्वास ठेवू नका, तसेच कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका, असे स्पष्ट आवाहन उपस्थित पदाधिकारी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधींनी पालकांना व स्थानिक नागरिकांना केले आहे. परिसरातील सुरक्षा वाढवून अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तलाठी ठाकरेंच्या घराबाहेर अज्ञातांचा गोळीबार; अमरावतीत खळबळ

Maharashtra News Live Update: विजय चौधरी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

श्रावणात ‘या’ एका भाजीचे करा सेवन; आरोग्य राहील ठणठणीत

Mens Beauty : पिळदार मिश्या आणि दाट दाढी हवी असेल तर.. या टिप्स करा फॉलो

नाशिकमध्ये मास्तरांचा 22 वर्ष सुरू होता गैरप्रकार; बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT