Pune Political Saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics : पुण्याच्या राजकारणात उलथापालथ; भाजपच्या अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा

Pune Political News : पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपच्या अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

भाजप युवा मोर्चा महिला पदाधिकारी तेजस्विनी कदम आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा वाद पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचला आहे. तेजस्वी कदम यांच्या गंभीर आरोपानंतर अनुप मोरे अडचणीत सापडले. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती. रोहित पवारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले होते. भाजप पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

अनुप मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, या कारणासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये भाजप युवा मोर्चाच्या महिला पदाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनुप मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

अनुप मोरे यांनी पदाचा राजीनामा देताना पत्रात म्हटलं की, 'गेले काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जाताहेत. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते'.

'माझे आई-वडील माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भाजपचं काम प्रामाणिकपणे करतोय. बुथ अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षापर्यंत पोहोचण्यासाठी पार्टीने माझ्यावर विश्वास टाकलाय. आमचं कुटुंब आणि मी सदैव भाजपसोबत आहे आणि असेन. भाजपची माझ्यामुळे प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी सदैव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत पार्टीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या माझ्यावरील विश्वासामुळे मी माझ्या भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटलं.

'येत्या काळामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी नंतर स्वतः या तत्वावर सदैव निष्ठेने काम करेन. तरी आपण माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. कळावे', असं त्यांनी शेवटी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

Surya Gochar: जानेवारीत सूर्य ग्रह करणार २ वेळा गोचर; 'या' राशींना लागणार जॅकपॉट, मिळणार भरपूर पैसा

Women Cricket History: भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास

Silver Price: इतिहासात पहिल्यांदाच चांदी २ लाखांच्या पार, सोनं महागलं, आता पुढे काय?

कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT