BJP targeted Eknath Shinde Group in Lok Sabha 2024 elections maharashtra politics  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान, थेट शिंदे गटातील खासदारच टार्गेटवर; नेमकं काय शिजतंय?

Shinde Group vs BJP: सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

विनय म्हात्रे, साम टीव्ही

Eknath Shinde Group vs BJP Clash

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पक्षात मोठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. पक्ष फुटीनंतर एकमेकांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी नवनवीन डाव टाकले जात आहे. एकीकडे महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

भाजप-शिंदे गटात संघर्ष वाढला

कारण, कल्याण, ठाणे पाठोपाठ आता नवी मुंबईतही भाजप विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde) असा संघर्ष वाढताना दिसून येत आहे. शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचा दावा, शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. भाजप शिंदे गटातील नेत्यांना जाणून बुजून टार्गेट करीत आहे, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केला आहे.

शिंदे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

नवी मुंबईत येणारे एसआरए सारखे विकासाचे प्रकल्प भाजपकडून थांबवले जात आहेत. आम्ही युतीत आहोत की विरोधात आहोत हे समजत नाही, असा सवाल विजय चौगुले यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही, तर विजय चौगुले यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप देखील केला आहे.

आमदार गणेश नाईक यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ED ची धमकी दिली जात आहे, शिंदे गटाच्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना ते टार्गेट करीत आहेत, असं चौगुले यांनी म्हटलं आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील चौगुले यांनी भाजपला दिला आहे.

शिंदे गटाच्या ४ जागांवर भाजपचा डोळा?

कल्याण आणि ठाणे लोकसभेच्या जागेवरुन शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचं वर्चवस्व आहे. पण भाजपाने सुद्धा आपली पकड निर्माण केली आहे. ठाण्यातील जागा शिंदेंनी भाजपला सोडावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे.

मात्र, शिंदे गटाने ही जागा भाजपला सोडण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवलीत जागेवरुन सुद्धा भाजप-शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहे. कल्याणमधून मीच लढणार असा दावा, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

याशिवाय रत्नागिरी येथील लोकसभेच्या जागेवरुन देखील शिंदे-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. एकीकडे दोन्ही नेते समन्वयाने जागावाटपाचा तिढा सोडवत असताना आता नवी मुंबईतही भाजप शिंदे गटातील नेत्यांना टार्गेट करतंय, असा दावा करण्यात आल्याने हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

SCROLL FOR NEXT