shrikant bhartiya and sanjay raut. politics saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: संजय राऊत आमच्यावर भरवसा नाय का? सेनेची स्थिती; 'वाट पाहू या 'महाविकास' ची पत्रकार परिषदेची'

संजय राऊत असं युद्ध लढायचे नसते असेही श्रीकांत भारतीय यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीची नाेटीस आली की त्यांनी लगेच माताेश्रीवर धाव घेतली. मंगळवारी झालेली पत्रकार परिषद ही शिवसेनेची असेल असे राऊत यांनी जाहीर केले हाेते. परंतु त्यांच्या उजवी आणि डावीकडे सेनेचे ना विद्यमान मंत्री हाेते ना प्रमुख नेते. राज्यातील अन्य भागातून शिवसैनिक आले. परंतु मुंबईतील (mumbai) सेना कूठचं नव्हती. त्यामुळे मुंबईच्या शिवसैनिकांना आता संजय राऊत आमच्यावर भरवसा नाय का अशी म्हणायची वेळ आली आहे अशी टिप्पणी भाजपचे (bjp) प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्रकार परिषदेवर केली. (sanjay raut latest marathi news)

श्रीकांत भारतीय म्हणाले संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्यापुर्वी माझ्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद हाेईल असं जाहीर केले हाेते. आम्ही वाट पाहत आहाेत कधी हाेतेय ती पत्रकार परिषद. एका अर्थाने आता संजय राऊत यांनी काका (sharad pawar) मला वाचवा इतकेच म्हणायचे राहिले आहे.

शिवसेनेने त्यांची पत्रकार परिषद वा-यावर साेडली हे सिद्ध झालं आहे. पांडवांनीच अभिमन्यूचा वध करावा अशी स्थिती तुमची झाली आहे असेही श्रीकांत भारतीय यांनी नमूद केले. ते म्हणाले माताेश्रींनी भल्या भल्यांना घाम फाेडला इथं तर बाळासाहेबांच्या शिष्याला घाम फुटावा अशी स्थिती सर्वांनी पाहिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT