BJp news
BJp news  saam tv
मुंबई/पुणे

BJP | भाजपची लोकसभेच्या 'मिशन 45'साठी राहुल शेवाळेंच्या मतदार संघात बैठक; चर्चांना उधाण

जयश्री मोरे

मुंबई : भाजपची (BJP) लोकसभेसाठीच्या 'मिशन ४५' साठी राज्यात सुरुवात झाली आहे. भाजपची या मिशनसाठी आज मुंबईच्या दक्षिण मध्य जिल्हा पदाधिकारी यांची बैठक चेंबूरमध्ये पार पडली. खरे तर हा मतदार संघ शिंदे गटात सामिल झालेल्या राहुल शेवाळे यांचा आहे. मात्र, भाजपने चेंबूरमधून मिशनची तयारी सुरू केली आहे. या चेंबूरच्या या बैठकीनंतर भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या लोकसभेसाठीच्या मिशनवर प्रतिक्रिया दिली आहे. ( chandrashekhar bawankule News In Marathi )

भाजपच्या लोकसभेसाठीच्या मिशनसाठी आज मुंबईच्या दक्षिण मध्य जिल्हा पदाधिकारी यांची बैठक चेंबूरमध्ये पार पडली. या बैठकीला भाजप चे नेते चंदशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, तमिळ सेलव्हन आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी बावनकुळे म्हणाले, 'आम्ही सर्व ४८ जागांची तयारी करीत आहे. भाजपचे संघटन मजबूत करण्याची ही योजना आहे. १८ महिन्यात अनुराग ठाकूर येथे सहा वेळा येणार आहेत. सर्व प्रवास योजना आहे. प्रचंड ताकदीने हा मतदार संघ जिंकण्याची तयारी आहे. आमची ही तयारी एनडीए म्हणून आहे. शिवसेना भाजप युतीत आम्ही लढणार आहोत. राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा उपयोगात हे येईल'.

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले,'मंत्रिमंडळ विस्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मी पाच वर्षे मंत्री होतो. चार वेळा आमदार केला आहे .माझ्याकडे १६ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आहे. कधी संघटनेत काम करावे लागते. कधी सरकारमध्ये करावे लागते. त्यामुळे पक्ष जबाबदारी देईल, ती पार पाडायची असते. भाजपमध्ये कोणी नाराज राहत नाही. पक्ष क्षमतेमुळे जबाबदारी देतो. पक्षाने जे आदेश दिले ते मानणारे कार्यकर्ते आहोत. ही 'मिशन 45'नाही, तर 'मिशन 48' ची तयारी आहे. आम्ही बारामती जिंकू, निर्मला सीतारमण या तिथल्या प्रभारी आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT