मुंबई/पुणे

Farmer Story: मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य 'फुल'ले, एका फोनवर दूर झाली अडचण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दसरा जवळ आला असून कोरोनाचे (Corona) सावट आता बऱ्यापैकी ओसरले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी सगळे सण धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर दसऱ्याच्या तयारीसाठी राज्यातील लोकांची लगबग सुरू आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. ही मागणी ओळखून निफाडमधल्या एका तरुण शेतकऱ्याने (Farmer) झेंडू थेट मुंबईत आणून विकायचे ठरवले होते.

मात्र मुंबईत पूर्वापारपासून आपला व्यवसाय करणारे फूलविक्रेते, पार्किंगची अडचण यामुळे या शेतकऱ्याला काहीशी अडचण होत होती. आडमार्गाला कमी वर्दळीच्या ठिकाणी या शेतकऱ्याला त्याचा ट्रक लावावा लागल्याने त्याच्या फुलांची म्हणावी तशी विक्री होत नव्हती. (Latest Marathi News)

फुलांचा दर्जा चांगला असूनही फुले विकली जातील की नाही या चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याने त्याची अडचण काही नागरिकांना बोलून दाखवली. या नागरिकांनी मुंबई भाजप सचिव अमोल जाधव यांच्या कानावर ही बाब घातली. जाधव यांनी तत्काळ मुलुंड पश्चिमेतील भाजप नगरसेवक नील सोमय्या यांना ही बाब सांगून या शेतकऱ्याला काही मदत करता येईल का हे पाहण्याची विनंती केली.

सोमय्या यांनी वॉर्ड अध्यक्ष सरोज झा यांना सांगून या शेतकऱ्याला मदत करण्यास सांगितले. झा यांनी तत्काळ या शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना एक चांगली जागा मिळवून दिली. हे सगळं अवघ्या अर्ध्या तासाचा आत झालं. इतक्या वेगाने झालेली हालचाल पाहून तरुण शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटलं.

निफाडवरून चार पैसे मिळतील या अपेक्षेने मुंबईतील मुलुंड इथे आलेल्या शेतकऱ्याला तुम्हीही मदत करू शकता. धनराज असे या शेतकऱ्याचे नाव असून दादरच्या फूल बाजारात होलसेल दरात जी झेंडूची फुले मिळत आहेत, त्यापेक्षा कमी दरात आपल्याकडे फुले मिळत असल्याचे धनराज याने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT