titwala, cash, gold
titwala, cash, goldsaam tv

Titwala: बॅग उघडताच पाेलीस चक्रावले; 1.71 कोटीची सोन्याची बिस्किटं, बेहिशोबी रक्कमेसह एकास घेतलं ताब्यात

टिटवाळा स्थानकामध्ये एका व्यक्तीकडून 1.71 कोटीची सोन्याची बिस्किटं आणि बेहिशोबी रक्कम ताब्यात

Titwala : टिटवाळा (titwala) रेल्वे स्टेशमध्ये (railway station) तब्बल एक कोटी 71 लाखाचा मुद्देमाल (रोख रक्कम आणि सोने) पकडण्यात टिटवाळा आरपीएफला यश आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

शनिवारी (ता. एक ऑक्टोबर) ​​पुष्पक एक्स्प्रेसमधून टिटवाळा प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरली. त्यावेळी रेल्वे आरपीएफचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एल.बी.वाघ आणि एमएसएफ कर्मचारी शुभम खरे यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चाैकशी सुरु केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. (Tajya Batmya)

titwala, cash, gold
Goa : गाेव्याच्या दारुमुळं चढला पारा; काॅंग्रेस नेत्याच्या ट्विटवर शंभूराज देसाईंनी फटकारलं

त्यामुळं पाेलिसांचा संशय बळावला. पाेलीसांनी संबंधितास पुढील चौकशीसाठी आरपीएफ टिटवाळा कार्यालय येथे आणले. रेल्वे आरपीएफच्या महिला इन्स्पेक्टर टिटवाळा अंजनी बाबर यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समाेर आली.

titwala, cash, gold
Udayanraje News : उदयनराजेंचा पवार कुटुंबियावर गंभीर आराेप म्हणाले...,

संबंधित व्यक्ती ही सोन्याचा व्यापार करत असल्याचे त्याने सांगितलं. ताे लखनौहून आला हाेता. त्याच्या बॅगची पोलिसांनी तपासणी करण्यासाठी बॅग उघड असं सांगितलं असता त्याने टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळताच त्याने स्वेच्छेने बॅग उघडली. या बॅगेत रोख रक्कम, सोन्याची बिस्किटे आणि दागिने आढळुन आले.

titwala, cash, gold
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

संबंंधिताकडे रोख रक्कम किंवा सोन्याची माहितीबाबत कोणतीच कागदपत्र अथवा स्पष्टता नसल्यामुळे आरपीएफ पोलिसांनी आयकर अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढील कारवाईसाठी अहवाल पाठवला. संबंधित संशयित आराेपीचे नाव जीपी मोंडल असून ताे कामोटे (नवी मुंबई) येथे वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

titwala, cash, gold
Satara News : गर्दीत आपलीच लोक टाळ्या वाजवायला बसवली असतात; उदयनराजेंचा अजित पवारांना खाेचक टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com