Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Maharashtra political News : निकालाच्या आदल्या दिवशीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची मशाल हाती धरली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या निकालावरून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी चाचपणी सुरु आहेत. दोन्ही आघाड्यांकडून अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांना संपर्क करणे सुरु आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे मुंबई सचिवांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. निकालाआधीच पक्षाची साथ सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. सचिन शिंदे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपच्या मुंबई सचिव पदाचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे सचिन शिंदे यांनी पक्षाची साथ सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. जनतेच्या सेवेसाठी निर्णय घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

सचिन शिंदे म्हणाले, 'भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झालेला नाही. मात्र, योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादर-माहीम विभागात काम करत आहे. पक्षासाठी प्रामाणिक काम केले आहे. पक्षासाठी विविध उपक्रम राबवत योगदान दिले. या सर्व योगदानाला सन्मान आणि प्रोत्साहन मिळाले नाही'.

'माझ्या निर्णयाचा आधार हा कोणाविषयी नाराजी नाही. जनसेवेसाठी संधी आणि जबाबदारी मिळावी, हा हेती आहे. त्यासाठी प्रभावी आणि तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ठाकरे गटात मला संधी मिळेल. माझ्या कर्तव्य अधिक प्रभावीपणे करेल. भाजपमधील अनेक कार्यकर्ते माझ्या पाठिशी आहेत. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयासाठी कारणे व माझ्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे निवेदन सादर करत आहेत, असे ते म्हणाले.

'ठाकरे गटात प्रवेश करून पुढील राजकीय वाटचाल अधिक जोमाने आणि तळमळीने प्रारंभ करणार आहे. मी वचनबद्ध राहून अधिक जोमाने आणि तळमळीने काम करणार आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन. मी विश्वासाला पात्र राहण्यासाठी कार्यरत राहीन. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याला न्याय देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य राहीन,असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT