Paithan Exit Poll: पैठणकर कुणाच्या बाजूने, विलास भुमरेंना पुन्हा पसंती मिळणार का? पाहा Exit Poll

Paithan Assembly Election: उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पैठण मतदारसंघातून विलास भुमरे विजयी होण्याची शक्यता आहे.
Paithan Exit Poll
Paithan Exit PollSaam Tv
Published On

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. उद्या निकाल असून कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. पैठणमधून शिंदे गट विजयी होणार असल्याचे दिसत आहे. पैठणमधून विलास भुमरे संभाव्य आमदार आहे.

Paithan Exit Poll
Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

पैठणमधून शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार आहे. शिंदे गटाचे विलास भुमरे विरुद्ध ठाकरे गटाचे दत्ता गोर्डे अशी लढत या मतदारसंघात होणार आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचं पारडं जड होताना दिसत आहे.

पैठणमध्ये शिंदे गटाचे विलास भुमरे विजयी होऊ शकतात. पैठणमध्ये फार पूर्वीपासूनच संदिपान भुमरे यांचा प्रभाव आहे.सलग चार वेळा संदिपान भुमरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे संदिपान भुमरे यांचे चिरंजीव म्हणून विलास भुमरे हे बाजी मारु शकतात.

संदिपान भुमरे हे पालकमंत्री असताना पैठण विधानसभा मतदारसंघात त्यांनी खूप कामे केली आहेत. याचाच फायदा त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना होऊ शकतो. क

संदिपान भुमरे यांनी अनेक योजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना खूप फायदा होत होता. या मतदारसंघात भुमरे कुटुंबाचा प्रभाव होता.

Paithan Exit Poll
Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

पैठण मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. पूर्वीपासूनच पैठण मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, आता विभाजन झाल्यानंतर ठाकरे गटाकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचेचं लक्ष होतं. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी दत्ता गोर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघातून विलास भुमरे हे विजयी होण्याची शक्यता जास्त आहे.

Paithan Exit Poll
Maharashtra Exit Poll: कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे होणार आमदार? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com