Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Sunil shelke vs Bala Bhegade Maharashtra Maval Exit Poll Result : मावळमध्ये कुणाचा आमदार होणार? बंडखोर बापू भेगडे विद्यमान आमदार सुनील शेळकेंना धक्का देणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो ?
Maval Vidhansabha Exit Poll Result
sunil shelke vs bala bhegade maval exit poll Resultsunil shelke vs bala bhegade maval exit poll Result
Published On

Maval Assembly constituency Exit poll result : लोकसभेला सांगली पॅटर्नने करिष्मा केला होता, विधानसभेला आता मावळ पॅटर्नची चर्चा रंगली होती. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, मावळ पॅटर्न फोल ठरत असल्याचे दिसत आहे. मावळमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदाराचे पारडे जड असल्याचं दिसतेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मावळचा संभाव्य आमदार स्पष्ट झालाय.

मावळ विधानसभा मतदारसंघासाठी यावर्षी चुरशीची लढत पाहायला मिळाली. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांची कडवे आव्हान निर्माण केले. त्यामुळे मावळमधील ही यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचे चित्र मतदारसंघाच्या पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत मावळ पॅटर्नची चर्चा रंगली होती. बापू भेगडे यांनी महायुतीविरोधात दंड थोपाटल्यानंतर मविआने मोठं पाऊल उचलले. मावळमध्ये मविआने आपला अधिकृत उमेदवारच दिला नाही. मविआ संपूर्ण ताकदीने बापू पठारे यांच्या मागे उभे राहिले. शरद पवार यांनीही बापू पठारे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मावळमध्ये सुनील शेळके यांचा विजय होताना दिसत आहे.

2019 विधानसभा निवडणूक आकडेवारी

भाजप : बाळा भेगडे, एकूण मते : 73 हजार 670

राष्ट्रवादी काँग्रेस : सुनील शेळके, एकूण मते : 1 लाख 67 हजार 548

सुनील शेळके : 93 हजार 878 मतांनी विजयी

महिला मतदार संख्या : 1 लाख 87 हजार 127

पुरुष मतदार संख्या : 1 लाख 96 हजार 188

तृतीयपंथी मतदार संख्या : 13

एकूण मतदार संख्या : 3 लाख 83 हजार 328...

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडविला. तब्बल पंचवीस वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ विधानसभा मतदारसंघ राषट्रवादीकडे शेळके यांनी खेचून आणला होता. मूळचे भाजपचेच असलेले सुनील शेळके यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधून विजय संपादन केला होता. मात्र यावेळी मावळ मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे. राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. . 1962 साली पहिल्यांदा मावळची निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसचे नामदेव मोहोळ विजयी झाले होते. 1972 मध्ये भारतीय जनसंघाने ही जागा जिंकली होती. त्यानंतर 1990 मध्ये ही जागा फक्त काँग्रेस पक्षाने जिंकली होती. 1995 ते 2014 या काळात भाजपने मावळचा गड अबाधित राखून ठेवला होता. मावळ मतदार संघात भाजपचे मोठे प्राबल्य आहे. मात्र 2024 ला दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. शेळकेंविरोधात बापू भेगडे यांचं तगडे आव्हान असेल. २३ तारखेला मावळचा आमदार कोण? हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com