ashish shelar and uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का'; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Ashish Shelar On Uddhav Thackeray : भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Mumbai News : भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'राम मंदिर आणि राम सेतूची खिल्ली उडवली, त्यांना हिंदी भाषिक समाज ओळखून आहे. हा समाज जाणतो की, जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, असा टोला भाजप मुंबई अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला. (Latest Marathi News)

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई कार्यालयात भाजपा मुंबई पदाधिकारी आणि उत्तर भारतीय मोर्चाची बैठक झाली.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, काल संपूर्ण मुंबईत भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ४१० ‍ठिकाणी साजरी करण्यात आली. अन्य कुठलेही पक्ष या जयंती उत्सवात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारेही दिसले नाहीत. या सर्व बाबींसह आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांचा आढावा व नियोजन आजच्या बैठकीत आम्ही केले, असेही त्यांनी सांगितले. त्यांनतर मुंबई भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले की, ज्यांनी राम मंदिराची चेष्टा केली, राम सेतूची चेष्टा केली ते आज मतांसाठी दारोदार फिरत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे ही अवस्था त्यांची झाली आहे. कधी उत्तर प्रदेशमध्ये यादवांना जाऊन भेटत आहेत तर कधी बिहारमध्ये जात आहेत, कधी तमिळनाडूमध्ये स्टॅलीन यांना जाऊन भेटत आहेत, तर मुंबईत रमेश दुबे यांना भेटत आहेत. आज मतांसाठी जोगवा मागण्याची, दारोदार फिरण्याची वेळ का आली. हिंदी भाषिक समाज भाजपा सोबतच आहे, आणि तो भाजपा सोबतच राहील'.

'भाजपने मुंबईत चौपाल सुरू केले, तेव्हा पासूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळे आज ते उत्तर भारतीय समाजाच्या बैठका घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगतो की, 'है तयार हम!' तसेच आम्हाला याची कल्पना आहे की, हिंदी भाषिक जाणतात “जो ना भगवान राम का वो ना किसी काम का!”, असा टोला आमदार ॲड आशिष शेलार यांनी लागावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

SCROLL FOR NEXT