Saam Tv
आरोग्यासाठी घातक असणारी बुरशी दूर करण्याचे सोपे आणि स्वस्त घरगुती उपाय
ओलावा आणि सीलनमुळे भिंतींवर काळी बुरशी जमा होते. यामुळे श्वसनाचे त्रास, ॲलर्जी आणि त्वचेचे आजार उद्भवू शकतात.
असलेल्या भागावर थेट पांढरा व्हिनेगर स्प्रे करा. १ तास तसंच ठेवल्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
१ चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून स्प्रे करा. जिद्दी डागांसाठी बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून लावा आणि १० मिनिटांनी साफ करा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट बनवा. टाईल्सच्या सांध्यांमध्ये किंवा भिंतीवर लावून घासल्यास बुरशी पूर्णपणे निघून जाते.
३% हायड्रोजन पेरॉक्साइड द्रावण बुरशीवर स्प्रे करा. १० ते १५ मिनिटे ठेवल्यानंतर कपड्याने किंवा स्क्रबरने पुसून काढा.
बाथरूम आणि किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा किंवा खिडक्या उघड्या ठेवा. वापरानंतर भिंती कोरड्या ठेवा.
पाईप किंवा नळाची गळती असल्यास ती लगेच दुरुस्त करा. भिंतींवर ओलावा राहिला नाही, तर बुरशी पुन्हा होणार नाही.
NEXT : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर