Maharashtra Monsoon Session  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Monsoon Session: राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद; विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने सामने

Rahul Gandhi Statement: राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने सामने आले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अंबदास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील 'तू-तू-मै-मै'मुळे चांगलाच गाजला. या घटनेचे दुसऱ्या दिवशीही विधानभवनात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विरोधात भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदारांनी विधानभवानाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक झळकवत राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

संसदीय अधिवेशनात राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका केली होती. अधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा संदर्भ सांगत भाजपवर टीका केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मावरील वक्तव्याचे महाराष्ट्र विधीमंडळातही पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र विधीमंडळात भाजप आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे बॅनर भाजप आमदारांनी झळकवले. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदमध्ये विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रसाद लाड नेमके काय म्हणाले?

भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, 'अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा झाला पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे. त्यांनी माझी नाही, तर माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. प्रत्येक गुन्हेगारांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. माझं मत आहे की, सरकारच्या निर्णयाशी सहमत राहील. पण राजीनामा मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना शिक्षा केली पाहिजे'.

'राहुल गांधी यांच्या निषेधासाठी सभागृहात राहिलो. त्यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी मला शिवीगाळ केली. सभागृहात गैरवर्तन केलं. २५ वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झालेल्या आईविषयी अपशब्द काढले. एका विरोधीपक्ष नेत्याला हे योग्य वाटतं का? बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीला महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा. त्यांचा पूत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाता नेता अशा शब्दात शिवीगाळ करतो. त्यांनी त्यांना जाब विचारायला हवा. दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा अपमान केला आहे, असे लाड पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

Cancer vaccine: कॅन्सरविरोधी लस प्रतिबंधनासाठी नव्हे, तर आजाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती

Dashavatar Collection: एकाच दिवशी 3 मराठी चित्रपट प्रदर्शित; 'दशावतार'ने मोडले कमाईचे रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT