MNS-BJP
MNS-BJP  SaamTvNews
मुंबई/पुणे

"भाजपच्या नावात अवघा भारत; त्याप्रमाणेच मनसेच्या नावात अवघा महाराष्ट्र"

प्रदीप भणगे

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी या नावातच अवघा भारत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावातच अवघा महाराष्ट्र आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) या फेसबुक पोस्ट चर्चा आता डोंबिवलीत (Dombivli) रंगू लागली आहे. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीच्या काही भागात पिण्याच्या पाण्याबाबत मोठी समस्या आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमीत आणि पुरेसा व्हावा यासाठी सोमवारी मनसेने पालिका मुख्यालयावर तहान मोर्चा काढला.

हे देखील पहा :

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. मात्र, यावेळी सर्वाचं लक्ष वेधलं ते भाजपच्या आमदारांनी. मनसेच्या (MNS) या तहान मोर्चात भाजपच्या आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे-भाजपने पहिल्यांदाच एकत्र मोर्चा काढला आहे. भाजप-मनसे युतीबाबत चर्चा सुरु असताना डोंबिलीतील हा मोर्चा भाजप-मनसेच्या भविष्यातील युतीची नांदी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

त्यातच आज भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची दोस्तीचे संकेत देत, फेसबुक पेजला पोस्ट केली आहे. भारतीय जनता पार्टी या नावातच अवघा भारत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावातच अवघा महाराष्ट्र आहे." अशी पोस्ट करत हात मिळवणी सिमबॉल टाकला आहे.तसेच यांनी याबाबत ट्विट सुद्धा केले आहे त्यामुळे भाजप आमदार या पोस्ट चर्चा आता रंगू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीसांविरोधात रचला होता मोठा कट, मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT