जयश्री मोरे
Nitesh rane News : धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणात भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला आहे. आज, शनिवारी मृत महिला रुपालीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री प्रभात लोढा, आमदार नितेश राणे यांच्या घरी गेले होते. या बाबत लोढा यांनी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असं आश्वासन दिले. तर नितेश राणे यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. रुपालीच्या कुटुंबीयांना काही झालं तर आम्ही पोलिसांना सोडणार नाही, असा इशारा देखील नितेश राणेंनी (Nitesh Rane) दिला आहे. (Rupali Chandanshive Case)
मुंबई उपनगर पालकमंत्री प्रभात लोढा, आमदार नितेश राणे यांनी मृत रुपाली चंदनशिवेच्या कुटुंबीयाची भेट घेतली. त्यानंतर आमदार नितेश राणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले, 'रुपालीच्या आई-वडिलांना संरक्षण द्वावे. पोक्सो संदर्भात कारवाई अजून का झाली नाही ? अॅट्रोसिटी अॅक्ट गुन्हा देखील नोंद करावा, अशी मागणी पोलिसांनाकडे केली आहे. रुपालीच्या मुलांबद्दल सरकार नक्की दखल घेतील. हा एक दिवसाचा इव्हेंट नाही. सदर प्रकरणात मुलगी अल्पवयीन आहे. मात्र, पोक्सो अंतर्गत कलम लावण्यात आलेला नाही'.
'या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. रुपालीच्या कुटुंबीयांना काही झालं तर आम्ही पोलिसांना सोडणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.