पंढरपूर: शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याआधी (Dasara Melava) महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली शिवसेना हिच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्यामुळे यंदा मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जात आहे.अशातच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक (Shivsainik) बीकेसी मैदानावर येणार येतील आणि शिवतीर्थावरील मेळाव्याला जाणता राजा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांचे लोक जातील अशी टीका शिंदे गटातील आणि 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल' फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ -
मेळाव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक येणार आहेत. तर शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला जाणता राजा शरद पवार यांच्या विचारांचे लोक असतील.
५ ऑक्टोंबरला मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सूरू आहे. याच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली.
तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आधी उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकणार आहेत. यावर विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, आता दादांना भाषण ऐकण्याशिवाय दुसरे काय काम उरले नाही. आता त्यांनी इंदुरीकर महाराज यांचं किर्तन ऐकावे त्यासाठी कॅसेट घ्यावीत असा टोलाही लगावला.
शिवाय शरद पवार यांनी एस काँग्रेस काढली ५० आमदार आले . राष्ट्रवादी काढली पन्नासच्या वर जाईना कसं तर आर.आर.आबा असताना ५० च्या वर त्यांनी नेले. राज्यात फिरले आणि देशात फिरले तरी ५० आमदारांच्या वर राष्ट्रवादी जात नाही. एवढ्यातच सगळा खेळ सुरू आहे असा टोमणा देखील त्यांनी शरद पवारांना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.