BJP On Shivsena, uddhav thackeray, ashish shelar Saam Tv
मुंबई/पुणे

तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का?; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसनेते (ShivSena) मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या मुखपत्रातून भाजपवर टीका सुरू आहेत. आजही सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या आरोपाला आज भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

BJP On Shivsena

आजही शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. ‘सीएमआयई’ने जाहीर केलेल्या ताज्या अहवालावरून देशातील बेरोजगारीची वाढती संख्या विस्फोटक वळणावर असल्याचेच सिद्ध झाले आहे. तथापि, केंद्रीय सरकार मात्र बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा वेगाने धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाच्या औद्योगिक उत्पादनात कशी झपाटय़ाने वाढ होते आहे, याचे ढोल बडवणारे आकडे जाहीर करणारे सरकार बेरोजगारीच्या भयावह संकटाविषयी काहीच का बोलत नाही?, असा सवाल आज केंद्र सरकावर शिवसेनेने केला आहे.

देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. हाताला काम मिळावे म्हणून देशातील तरुणवर्ग वणवण भटकतो आहे, पण सरकारी वा खासगी कुठल्याही क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीच उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांच्या या फौजांवर वैफल्यग्रस्त होण्याची वेळ आली आहे. बेकारीचे हे वाढते संकट आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचा आक्रोश सरकारच्या बधीर झालेल्या कानापर्यंत पोहोचणार आहे काय?, असंही आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT