Starbucks CEO |भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्सचे नवे सीईओ

ज्या भारतीयांवर एकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. आज त्याच भारतीयांचे जगातील अनेक मोठ्या कंपन्यांवर राज्य आहे.
Starbucks CEO, Laxman Narasimhan
Starbucks CEO, Laxman NarasimhanSaam Tv
Published On

नवी दिल्ली: ज्या भारतीयांवर (India) एकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. आज त्याच भारतीयांचे जगातील अनेक मोठ्या कंपन्यांवर राज्य आहे. आज भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसपासून ते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापर्यंत भारतीय जगभरात आपला ठसा उमटवत आहेत आणि जागतिक कंपन्यांची पहिली पसंती बनत आहेत. आता ग्लोबल कॉफी चेन स्टारबक्सने गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी त्यांच्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. (Starbucks CEO)

Starbucks CEO, Laxman Narasimhan
देवघर विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्राेलमध्ये घुसल्याने भाजप खासदारासह ९ जणांवर गुन्हा दाखल

पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले लक्ष्मण नरसिंहन यांची स्टारबक्सचे नवे सीईओ म्हणून निवड करण्यात आली आहे. आता भारतीय (India) सीईओंच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. नरसिंहन यांची स्टारबक्स कॉफी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांची जगभरात ३४,००० स्टोअर्स आहेत आणि विशेष कॉफीचा अग्रगण्य रोस्टर आणि किरकोळ विक्रेता आहे.

Starbucks CEO, Laxman Narasimhan
Indian Economy: भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था, ब्रिटनलाही टाकलं मागे

Starbucks ने १ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर केले आहे. कंपनीने भारतीय वंशाचे असलेले लक्ष्मण नरसिंहन यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. १ ऑक्टोबर रोजी लंडनहून सिएटल, वॉशिंग्टन येथे स्थलांतरित झाल्यानंतर ते पदभार घेणार आहेत.

नरसिंहन सध्या यूकेस्थित आरोग्य, स्वच्छता आणि पोषण कंपनी रेकिटचे प्रमुख आहेत. आणि जागतिक कॉफी दिग्गज हॉवर्ड शुल्त्झ यांची जागा घेणार आहेत, ते एप्रिल २०२३ पर्यंत सीईओ म्हणून राहणार आहेत. नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com