देवघर विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्राेलमध्ये घुसल्याने भाजप खासदारासह ९ जणांवर गुन्हा दाखल

विमानतळ डीएसपी सुमन आनन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Deoghar Airport
Deoghar AirportSaam Tv
Published On

झारखंड - देवघर विमानतळाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गोड्डा येथील भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी यांच्यासह ९ जणांविरुद्ध कुंदा पोलीस (Police) ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विमानतळ डीएसपी सुमन आनन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 ऑगस्ट रोजी गोड्डा येथील लोकसभेचे खासदार निशिकांत दुबे, त्यांचे पुत्र कनिष्क कांत दुबे, माहिकांत दुबे, खासदार मनोज तिवारी, मुकेश पाठक, देवता पांडेय, पिंटू तिवारी यांच्या विरोधात देवघर विमानतळाच्या एटीसीमध्ये जबरदस्तीने प्रवेश करणे आणि पदाचा गैरवापर करून एटीसीला मंजुर करून घेतल्याचा आरोप आहे.

हे देखील पाहा -

याशिवाय देवघर विमानतळाचे संचालक संदीप धिंग्रा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसपींनी केलेल्या तक्रारीनुसार, निशिकांत दुबे यांच्यासह 9 जण 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता चार्टर्ड विमानाने देवघरला आले होते. संध्याकाळी परतत असताना दुबे यांच्यासह इतरांनी जबरदस्तीने एटीसीच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर मंजुरी घेतल्यानंतर खासदार आणि त्यांच्यासोबतचे लोक चार्टर्ड विमानाने परतले.

Deoghar Airport
पोषण आहारात अळ्या, सोंडे आढळल्यानं पालकांनी काढला शाळेवर माेर्चा (पाहा व्हिडिओ)

प्रत्यक्षात 31 ऑगस्टला भाजपचे शिष्टमंडळ दुमका पीडित मुलीला भेटण्यासाठी आले होते. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासह दिल्लीचे खासदार मनोज तिवारी, कपिल मिश्रा यांच्यासह अनेकजण होते. दुमका येथून निघताना हे लोक संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास देवघर विमानतळावर पोहोचले आणि क्लिअरन्स घेण्यासाठी एटीसी रूममध्ये प्रवेश केला.

देवघर विमानतळावर रात्रीचे टेक ऑफ किंवा लँडिंग सुविधा नाही. तक्रारीनुसार हे लोक बळजबरीने एटीसी रूममध्ये घुसले. या घटनेमुळे भाजप खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com