Shiv Jayanti SaamTv
मुंबई/पुणे

Shiv Jayanti: शिव जयंती; ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही - राम कदम

शिव जयंतीच्या सोहळ्याला 500 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारने दिलीये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: शिव जयंतीच्या सोहळ्याला 500 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारने दिलीये. तर शिव ज्योतीसाठी 200 जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिव जयंती साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही, असा पवित्रा आता भाजपने घेतलाय (BJP Leader Ram Kadam Says We Will Celebrate Shiv Jayanti And Will Not Follow Any Restrictions).

"शिव जयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. अटी कसल्या टाकताय, हिन्दुचा उत्सव आला की लगेचच नियम, वा रे वा. करायचे ते करा. शिवजयंती उत्सव आम्ही धूम धडाक्यात करणारच", असं भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) म्हणाले.

शिवजयंतीसाठी 500 जणांना परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरेग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT