Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, काय आहे प्रकरण?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाकरेंनी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला, मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकाऱ्यांवर दबाव होता, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही, तर निवडणुकीच्या घोषणापत्रात त्यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील कोरलाई येथील १९ बंगले दाखवले नाही, त्यांनी माहिती लपवून गुन्हा केला आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नाववरील १९ बंगले निवडणूक घोषणापत्रात दाखवले नाही, ते बंगले त्यांनी गायब केले. त्यांनी अधिकारी निधी चौधरी आणि किरण गायकवाड यांना सांगितलं की, हे १९ बंगले गायब करा, असा आरोप सोमय्या यांनी केला.

इतकंच नाही, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकारी अधिकारी मातोश्रीचे कर्मचारी झाले होते, मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकाऱ्यांवर दबाव होता, आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जो पहिला रिपोर्ट आला, त्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतने कबूल केले आहेत, की रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले होते. असंही किरीट सोमय्या म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? रूपाली चाकणकर यांची रोहिणी खडसेंवर टीका

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT