INDIA Mumbai Meeting: देशभरातील विरोधीपक्षांच्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक (India Aghadi Meeting) आज मुंबईत पार पडत आहे. इंडिया आघाडीची आजची ही तिसरी बैठक असून या बैठकीमध्ये २८ पक्ष सहभागी झाले आहेत. विरोधकांच्या या बैठकीवर आता भाजप नेत्यांकडून (BJP Leaders) टीकेची झोड सुरु आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. 'मूर्खाच्या नंदनवनात जगणारी लोकं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आहेत', अशी टीका त्यांनी केली आहे.
आशिष शेलार यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'आज पत्रकार परिषद घ्यायची वेळ येत आहे हे मुंबई आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज पोरखेळ सुरु आहे. घमंडिया आणि डरपोक २८ पक्षांचा पोरखेळ सुरु आहे. हे एकटे भाजपचा सामना करूच शकत नाही. एकाचीही हिमंत नाही.'
'बाळासाहेबांची शिवसेना आता भाजपसोबत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत ते आज राहुल गांधींसोबत आहेत. संजय राऊत हे मराठीविरोधी आहेत. आजपासून संजय राऊत महाराष्ट्रविरोधी भूषण असा पुरस्कार आहेत. जयंत पाटील यांचा मुंबईशी संबध काय? त्यांचा अभ्यास कमी आहे. हुत्तामा जे झाले त्याचं रक्त काँग्रेसच्या हाताला आहे. मूर्खाच्या नंदनवनात जगणारी लोकं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आहेत.', असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. 'उद्धवजींच वाक्य म्हणजे बालिशपणा. आमच्याकडे बरेच पंतप्रधान यांचे उमेद्वार आहेत. घरात बसून राजकारण करण्याची सवय झाली आहे का? प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान असं आहे का? जी मंडळी जमली आहेत ते कोण? उद्धवजींनी उत्तर द्यावं बाळासाहेबांनी ज्यांचा आयुष्यभर द्वेष केला. त्यांना एकत्र बोलवून त्यांच्या पत्रावळ्या उचलत आहात. काँग्रेसच्या पत्रावळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सैनिक आणि पवारसाहेबांचा पक्ष करत आहेत.' अशा शब्दा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र केले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना आशिष शेलार यांनी सांगितले की, 'माझा २८ पक्षांना सवाल आहे की लोकशाही वाचवायला एकत्र आलात की स्वतः च कुंटुंब? 'माझं कुंटुब माझी जबाबदारी' हा आता राष्ट्रीय खेळ आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. हे सर्व जण आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी खेळ खेळत आहेत. भाजप जनतेला वाचवण्यासाठी पुढे येत आहे. आमचा या २८ पक्षांना सवाल आहे की तुमचा नेता कोण? पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावर त्यांनी स्वत: उत्तर द्यावं असं देखील ते म्हणाले. तसंच, महाराष्ट्रात आमच्या ४५ पेक्षा जास्त जागा येणार यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.