NCP Crisis News: अनिल देशमुख आमच्याकडून निवडणूक लढणार; अजित पवार गटाचा मोठा दावा, राजकीय समीकरणं बदलणार?

Anil Deshmukh News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कटोलमधून अजित पवार गटाच्या तिकीटावर लढणार आहेत, असा दावा अजितदादा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.
Anil Deshmukh to contest election from Ajit Pawar group Big claim of Prashant Pawar
Anil Deshmukh to contest election from Ajit Pawar group Big claim of Prashant PawarSaam TV
Published On

Prashant Pawar on Anil Deshmukh: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन बड्या नेत्यांनी पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न सुरू आहे. (Latest Marathi News)

दरम्यान,नागपूरमध्ये अजित पवार गटाचा पहिला कार्यकर्ता मेळावा होणार आहे. २ सप्टेंबरला प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधीच एक मोठा दावा करण्यात आला आहे.

Anil Deshmukh to contest election from Ajit Pawar group Big claim of Prashant Pawar
Maharashtra Politics: मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, 'इंडिया आघाडी'च्या बैठकीआधी मुंबईत झळकले बाळासाहेबांचे बॅनर्स

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे कटोलमधून अजित पवार गटाच्या तिकीटावर लढणार आहेत, असा दावा अजितदादा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता अनिल देशमुखही अजित पवार गटात जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले प्रशांत पवार?

अजितदादा (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात विदर्भात राष्ट्रवादीची पायाभरणी सुरू झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसोबत महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही नागपूरमध्ये हा पहिला मेळावा घेत आहोत. यानंतर वर्धा, अमरावती, चंद्रपूर यासारख्या विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये आम्ही मेळावे घेणार आहोत, असं प्रशांत पवार यांनी म्हटलं आहे.

Anil Deshmukh to contest election from Ajit Pawar group Big claim of Prashant Pawar
India Aghadi Meeting: मुंबईत इंडिया आघाडीची आज महत्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरेंकडून डिनरचं आयोजन, मेन्यूमध्ये खास काय?

प्रशांत पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतही मोठं विधान केलं. अनिल देशमुख अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार, असा दावा प्रशांत पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे वर्तुळात चर्चांना उधान आलं असून नागपुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

अनिल देशमुखांनी खोडला प्रशांत पवारांचा दावा

दरम्यान, प्रशांत पवार यांनी केलेला दावा अनिल देशमुख यांनी खोडून काढला आहे. अजितदादा गटात जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. प्रशांत पवारला समजायला पाहिजेत, दुनियेला माहितीय की, मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंतसोबत राहणारा आहे. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. सगळ्यांना माहितीय मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com