Maharashtra Politics x
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भारतीय जनता पक्षामध्ये मोठी धुसफूस, पदनियुक्तीवरुन संघर्ष वाढल्याची चर्चा

Maharashtra Political News : भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकीच्या पूर्वी भाजपमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Yash Shirke

  • भारतीय जनता पक्षात नाराजी नाट्य

  • कार्यकारणी नियुक्तीवरुन संघर्ष

  • पदनियुक्तीवरुन अनेक नेते नाराज

विकास मिरगणे साम टीव्ही

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या आधी नवी मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा कार्यकारणीमधील नियुक्तीवरुन पक्षात धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई भाजप अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. या जिल्हा कार्यकारणीमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या अनेक कार्यकर्त्यांना डावळण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पक्षात अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याशिवाय नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष म्हणून अनेकजण स्पर्धेत असताना उज्ज्वला जगताप यांना संधी देण्यात आली. त्यामुळे महिलांनी सुद्धा भाजपच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या कारभारावर अनेक पदाधिकारी नाराज आहेत अशी माहिती समोर आली आहे.

महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्त्वाची भेट घेतल्यानंतर नवी मुंबई महिला भाजपा अध्यक्ष यांची नियुक्ती रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नियुक्ती रद्द करा नाहीतर आक्रमक होऊन राजीनामा देऊ असा इशारा भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. या नाराजी नाट्याची सध्या मोठी चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT