सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी नारायण राणे तसेच भाजपवर टीका केली होती. त्याला पडळकर यांनी उत्तर दिले आहे - Saam Tv
मुंबई/पुणे

..तर अतिमाननीय संजय राऊत, तुमच्या फुग्याला देशभरातून भोकं पडतील! (पहा व्हिडिओ)

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी नारायण राणे तसेच भाजपवर टीका केली होती. त्याला पडळकर यांनी उत्तर दिले आहे

साम टिव्ही

मुंबई : ''अतिमाननीय संजय राऊत, Sanjay Rajut कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो कायद्याच्या' फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,'' असे म्हणत भाजप BJP आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी शिवसेना Shivsena खासदार राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. Gopichand Padalkar Criticism on Shivsena Sanjay Raut

''राणे यांनी महाराष्ट्राला Maharashtra लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis व चंद्रकांत पाटील Chandrakant Patil राणेंच्या बेताल वक्तव्याचे समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करु लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे," अशी टीका राऊत यांनी काल शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून केली होती. त्यावर पडळकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. आता भाजप नक्की काय करणार? की या वेळीही बगला वर करुन नामानिराळे राहणार? महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले होते. Gopichand Padalkar Criticism on Shivsena Sanjay Raut

काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राऊत यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली होती. ''एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे. राणेंचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद असतो. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करीत नाही. राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे,'' असे पाटील म्हणाले होते.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT