अहमदनगर : भाजप व महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर आपापली भूमिका मांडली आहे. स्वतः राणे मोठे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराचे वक्तव्य त्या ठिकाणी होणे योग्य ठरणार नाही. मोठे नेते बोलत असतील, तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी आज (बुधवारी) अरणगावमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. Rohit Pawars cautious role in Rane case
केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राणे यांच्यावर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी राणे यांना अटक केली. यावरून राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला होता. दरम्यान, आमदार पवार जामखेड तालुक्यातील अरणगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राणे प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
यावेळी आमदार पवार यांनी, मोठे नेते बोलत असतील, तर मी त्याच्यावर जास्त काही बोलू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया देत राणे प्रकरणावर भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, की तोडफोड होत असताना सर्वसामान्य लोकांना त्रास होता कामा नये. सरकारच्या मालमत्तेचे नुकसान होता कामा नये, ही काळजी दोन्ही बाजूने घेणे आवश्यक आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत भाजप-शिवसेनेत वाद सुरू आहे. हा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियात ट्विटर युद्ध रंगले आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड होत आहे. Rohit Pawars cautious role in Rane case
याबाबत राष्ट्रवादीची भूमिका सावध आहे. आमदार रोहित पवार यांनीही तीच भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडल्याने इतर नेत्यांनी या वादात भाष्य करणे टाळले आहे. मागे एकदा नीलेश राणे आणि आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.