BJP Former MLA Narendra Mehta saam tv
मुंबई/पुणे

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तात्पुरता दिलासा, मुंबई हायकोर्टाने दिले 'हे' निर्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

चेतन इंगळे

मुंबई : मीरा-भाईंदरचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना मुंबई उच्च न्यायलायकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप (corruption) करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली असून मेहता यांना अटकेच्या कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ३० मे पर्यंत मेहता यांना अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहतांच्या घरी छापा टाकून महत्वाचे दस्तऐवज जप्त केले.

त्यानंतर मेहतांवर अटकेची टांगती तलवार होती. अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळण्यासाठी मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता न्यायालयाकडून मेहता अटकेपासून दिलासा देण्यात आला असून ३० मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT