उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. भाजपच्या श्रेष्ठींनी सहारनपूर महिला नेत्या कोमल गुर्जर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कोमल गुर्जर यांनी गंगोह विधानसभेचे आमदार किरत सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
कोमल गुर्जर यांनी किरत सिंह यांच्या विरोधात महापंचायत बोलावली होती. मात्र, पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. पोलीस परवानगी न मिळताही कोमल यांनी महापंचायत आयोजित केली. यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी शिस्तभंगाची कारवाई महिला नेत्याला पक्षातून काढून टाकलं आहे.
कोमल यांचा आरोप आहे की, आमदाराच्या इशाऱ्यावर माझ्या कुटुंबाचं शोषण केलं. आमदाराच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. महिला नेत्याने आरोपीच्या विरोधात पक्षश्रेष्ठीकडेही तक्रार केली होती. यानंतरही आमदाराच्या विरोधात कारवाई झाली नसल्याने महापंचायत बोलावली होती'.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला नेत्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही महापंचायत आयोजित करण्यात आली. त्यावेळी जमा झालेल्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे'.
आमदाराच्या समर्थकाचं म्हणणं आहे की, 'किरत सिंह यांना बदनाम करण्याचं षढयंत्र रचलं जात आहे'. पंचायतमध्ये झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर एका बंद खोलीत महापंचायत करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष भाजप डॉ. महेंद्र सैनी यांनी म्हटलं की, 'पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून कोमल गुर्जर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे'.
पोलिस अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, 'कोमल गुर्जर यांना पंचायत घेण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही पंचायत होऊ दिली नाही. आम्ही घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.