badlapur and ambernath Saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

shivsena Political News : बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेचा बुरुज ढासळल्याचं समोर आलं आहे. दोन्ही शहरात कमळ फुललं आहे.

Vishal Gangurde

अंबरनाथ, बदलापूर शहरात कमळ फुललं

दोन्ही नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष

शिवसेनाचा बुरूज ढासळल्याचे निकालाने समोर

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरात कमळ फुललं आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दोन्ही शहरात जिंकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोन्ही शहरात भाजप जिंकल्याने यानिमित्ताने शिवसेनेचा बुरूज ढासळल्याचे समोर आलं आहे.

बदलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला आहे. बदलापुरात अनेक वर्ष शिवसेनेचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. मात्र, पहिल्यांदाच बदलापुरात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. दुसरीकडे अंबरनाथमध्येही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. विशेष म्हणजे बदलापूर आणि अंबरनाथची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवली होती. त्यात दोन्ही शहरात शिंदे गटाचा पराभव हा श्रीकांत शिंदे यांनाही धक्का मानला जात आहे.

अंबरनाथमध्ये भाजपचे किती नगरसेवक निवडून आलेत?

अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे २३ नगरसेवक विजयी झाले आहेत. अजित पवार गटाचे ४ नगरसेवक विजयी झाले आहेत. काँग्रेसचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक असताना नगराध्यक्ष पद भाजपकडे गेलं आहे.

बदलापुरात भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिंदे गटाचेही २३ नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक निवडून आल्याचे पाहायला मिळालं आहे. वामन म्हात्रेंचा वचक असलेल्या बदलपुरात शहरात नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे विराजमान झाल्या आहेत.

वामन म्हात्रे यांनी कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली होती. त्यांनी पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा ६ जणांना उमेदवारी दिली होती. त्यातील ३ जणांना पराभवाला सामोरे जावं लागलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बदलापुरात सभा घेतली होती. त्याच बदलापुरात भाजपने विजयाचा झेंडा रोवल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; ५ राशींच्या लोकांची नैराश्य, कटकटीपासून होणार सुटका

Shocking : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान लागली आग; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले, 14 कार्यकर्ते जखमी

Chandrapur Civic Elections: चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा विजय, किंगमेकर विजय वडेट्टीवारांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Nagar Palika Election Result Live: मुंबईत बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT