Ashish Shelar and uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे खुद्दार, उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केलाय; आशिष शेलार यांची टीका

Ashish Shelar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील जनमताचा आणि मराठी मतदारांचा विश्वासघात केलाय, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी भांडूप येथील महायुतीच्या मेळाव्यात केली.

Satish Daud

Ashish Shelar on Uddhav Thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील जनमताचा आणि मराठी मतदारांचा विश्वासघात केलाय, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी भांडूप येथील महायुतीच्या मेळाव्यात केली. ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार आमदार मिहिर कोटेचा यांचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Breaking Marathi News)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रखर, कडवट हिंदुत्ववादाची होती. त्यांनी मतांसाठी कधीच आपली भूमिका बदलली नाही. मात्र, सत्तेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लाचार झाले होते, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली.

२०१९ मध्ये आम्ही(शिवसेना आणि भाजप) सोबत जनतेसमोर गेलो. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला कौल दिला. पण उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करत त्या जनमताचा अपमान केला, विश्वास घात केला. ते हिंदुत्व या मुद्द्यावरून भरकटले. त्यांची भूमिका न पटल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारकत घेतली. मग शिंदे गद्दार कसे? ते तर खुद्दार आहेत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना शेलार म्हणाले, "काल परवा माहिमच्या विशिष्ट धर्मियांशी संवाद साधताना झालं गेलं विसरून जा, अशी विनवणी उध्दव ठाकरे करत होते. १९९२-९३ च्या दंगली आणि त्यानंतर घडलेली बॉम्बस्फोट मालिका मुंबईकर विसरलेले नाहीत. मुंबईकरांच्या मनावरील ती जखम आजही ताजी आहे".

"या बॉम्बस्फोट मालिकेचा कट दाऊद इब्राहिमने रचला. टायगर आणि याकूब या मेमन बंधूंनी तो कट अंमलात आणला. आरडीएक्स मुंबईत आणले. बॉम्ब बनवले, ते पेरले. हे मेमन बंधू महिमचेच. बॉम्बस्फोट मालिकेत शेकडो लोकांचा देहाच्या चिंधड्या चिंधड्या होऊन मृत्यू झाला. त्याला जबाबदार धरत न्यायालयाने याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली".

"मात्र ही शिक्षा रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अस्लम शेख या आमदाराने केली आणि त्याच काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. हाच अस्लम शेख पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या मंत्रीमंडळात सहभागी झाला. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने याच याकुब मेमनच्या थडग्याची सजावट करण्याची परवानगी दिली, या गोष्टी महाराष्ट्र विसरू शकणार नाही".

संजय राऊत यांच्यावरही टीका

महायुतीच्या मेळाव्यातून आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली. जेव्हा राममंदिरासाठी सर्वसामान्य जनता वर्गणी गोळा करत होती. संजय राऊत आपल्या वर्तमान पत्रातून टिंगल, हेटाळणी करत होते. राम आणि रामसेतू हे सत्य आहे. मात्र, राऊत त्यास काल्पनिक म्हणत होते. काँग्रेसने तर प्रतिज्ञापत्रातून राम आणि रामसेतू हे काल्पनिक असल्याची भूमिका घेतली होती, अशी टीका शेलार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT