Maharashatra Election: कोण होणार जळगावचा खासदार? उन्मेष पाटलांचा भाजपविरोधात एल्गार

Jalgaon Loksabha Election : जळगाव लोकसभा मतदार संघातील यंदाची निवडणुक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. उन्मेश पाटलांनी तिकीट कापल्याने भाजपला रामराम करत ठाकरे गटाचा हात धरलाय
Jalgaon Loksabha Election
Jalgaon Loksabha Election saam

(संजय महाजन)

Jalgaon Loksabha Election : जळगाव लोकसभा मतदार संघातील यंदाची निवडणुक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. उन्मेश पाटलांनी तिकीट कापल्याने भाजपला रामराम करत ठाकरे गटाचा हात धरलाय.. त्यामुळे भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. कल महाराष्ट्राचामध्ये आपण पाहणार आहोत जळगाव लोकसभा मतदार संघाचा आढावा.

जळगाव. खान्देशातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ. मागील 4 निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलंय. भाजपडून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत स्मीता वाघ यांना उमेदवारी दिलीय.. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.

दुसरीकडे भाजपने तिकीट कापलेल्या विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतलीय आणि त्यांचे खंदे समर्थक करण पवार यांना उमेदवारी मिळवली. याचा फटका स्मिता वाघ यांना बसणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न काय आहेत त्यावर एक नजर टाकूया.

 • कापसाला दर नसल्याने शेतकऱ्यांचा आत्महत्या

 • अमळनेर तालुक्यातील पाडळसरे सिंचन प्रकल्प 150 कोटींहून 5 हजार कोटींवर गेला तरी काम पूर्ण नाही

 • गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्याची फक्त

 • दळण-वळणासाठी रेल्वे थांब्यांची मागणी

 • उद्योगधंद्यांच्या अभावामुळे रोजगाराचा प्रश्न

जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया.

 • सुरेश भोळे - जळगाव शहर - भाजप

 • गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण- शिंदे गट

 • अनिल पाटील - अमळनेर - अजित पवार गट

 • चिमणराव पाटील - एरंडोल - शिंदे गट

 • मंगेश चव्हाण - चाळीसगाव - भाजप

 • किशोर पाटील - पाचोरा - शिंदे गट

 • भाजप - 2 आमदार

 • शिंदे गट - 3 आमदार

 • अजित पवार गट - 1 आमदार

जळगावमध्ये भाजपची ताकद मोठी आहे.. भाजप पाचव्यांदा इथे विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे.. मात्र दुसरीकडे भाजपमधून आलेल्या करण पवारांच्या हाती मशाल देऊन ठाकरेही जळगावात उषःकालासाठी सज्ज झालेत.

Jalgaon Loksabha Election
Maharashtra Lok Sabha: पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क, कोणत्या जिल्ह्यात किती आहे नवमतदार जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com