BJP Chitra Wagh saam tv
मुंबई/पुणे

BJP Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडे भाजपकडून मोठी जबाबदारी, महत्वाचे पद मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chitra Wagh News : राज्यातील महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या दिवसांत मी पूर्ण ताकदीने काम करीन, असे त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करणे असो, त्यांना प्रत्युत्तर देणे असो, तसेच राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात अग्रेसर असलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघ यांना निवडीचे पत्र दिले.

भाजपने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याकडे महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याआधी उमा खापरे यांच्याकडे अध्यक्षपद होते. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडत आहेत. त्यामुळे आता भाजपने वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे, असे मानले जात आहे.

भाजपने नवी जबाबदारी दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या मी पदाला पूर्णपणे न्याय देईल. येणाऱ्या दिवसांत पूर्ण ताकदीने काम करेन. तीन वर्षांत तुम्ही मला काम करताना बघितलं आहे. सोमवारपासून माझा दौरा सुरू होणार आहे. पहिला दौरा सिंदखेडराजा येथून सुरू होईल, असं त्या म्हणाल्या. आज मला पक्षाने संधी दिली. मी तुमच्यापेक्षा काही वेगळी नाही. आता आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करायचे आहे, असेही आवाहन त्यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उमा खापरे या आमदार झाल्यानंतर पक्षाने महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड केली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील चांगल्या काम करणाऱ्या महिलांना चित्राताईंच्या नेतृत्वाखाली प्रवेश मिळेल, असे ते म्हणाले. चित्रा वाघ यांची निवड सार्थ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT