Amit Shah And J. P. Nadda Mumbai Visit Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Politics: अमित शहा, जेपी नड्डा ५ सप्टेंबरला मुंबईत येणार; BMC निवडणुकीसाठी भाजप बाप्पाच्या चरणी

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत गणेशोत्सवाची (Gansehsotsav 2022) जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सर्वच राजकीय पक्ष मोठा सहभाग दाखवत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार आहेत, त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील मुंबईत येणार आहेत. अमित शहा आणि जे. पी. नड्डा हे ५ सप्टेंबरला लालबागच्या राजाचे आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहे. (Amit Shah And J. P. Nadda Mumbai Visit)

हे देखील पाहा -

मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचेही अमित शहा दर्शन घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी (BMC Eelction 2022) जनतेची साथ आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाजप यंदा चांगलाच जोर लावत आहे, त्यामुळे अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अमित शहा मुंबईत येत असतात, यंदाही ते येणार आहेत. पण यंदा त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. भाजप यंदा सर्व सण-उत्सव जोरदारपणे साजरा करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपला आता मुंबई महापालिकेतही सत्तेत यायचं आहे. यासाठी शिंदे गटाला सोबत घेऊन शिवसेनेला राज्याच्या सत्तेनंतर मुंबईच्या सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे मुंबई या दौऱ्यात अमित शहा हे आशिष शेलार यांच्या घराच्या बाप्पाचेही दर्शन घेणार आहेत. शेलार यांची नुकतीच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दहिहंडीप्रमाणे गणेशोत्सवही जोरदार साजरा करुन भाजप जनतेपर्यं पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

भाजपने दहिदंडी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सर्व सण उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे. दरवर्षी भाजपच्या मुंबईत १०० ते १५० दहिहंडी असायच्या, पण यंदाच्या वर्षी मुंबईत भाजने ३७० दहिहंडीचे आयोजन केले होते. यावरुन भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी खूपच गंभीरपणे काम करत असल्याचं चित्र आहे. राज्याची सत्ता हातात घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही (BMC) सत्ता मिळवण्यासाठी भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे.

सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे यंदाची बीएमसी निवडणुक ही शिवसेनेसाठी तारेवरची कसरत करणारी ठरेल. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने भाजपची ताकद वाढली असून मुंबईत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कसून प्रयत्न करत आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना ९३ जागा, भाजप ८२ जागा, काँग्रेस ३१ जागा, रा.काँग्रेस ९ जागा, मनसे १ जागा, सपा ६ जागा, एमआयएम २ जागा आणि अपक्ष ६ जागा असं समीकरण होतं. भाजपने मागच्या निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला चांगलाच धक्का दिला होता. महापौर शिवसेनेचा झाला असला तरी भाजपने शिवसेनेला आपली महात्वाकांक्षा दाखून दिली. त्यामुळे यंदा आपली सत्ता टिकवण्यासाचं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT