Nadia Serezhkina Viral Video: लाईव्ह बातमी देत असताना घटनास्थळी असलेला Reporter (प्रतिनिधी) आणि स्टुडीओत बसलेला अँकर यांना तारतम्य ठेवत बातमी द्यावी लागते. रिपोर्टरला बातमी देताना अनेकदा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. अशाच घटनेचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एक महिला पत्रकार लाईव्ह रिपोर्टींग करत असताना अचानक एक कुत्रा (Dog) कॅमेऱ्यासमोर आला आणि त्याने चक्क त्या महिला रिपोर्टरचा माईकच (Boom Mic) पळवला. हे सगळं इतकं अचानक घडलं की, स्टुडिओत बसलेली महिला अँकरही गोंधळून गेली. हा सर्व गंमतीशीर प्रसंग On Air म्हणजे लाईव्ह गेल्याने सर्व प्रेक्षकांनी तो पाहिला आणि यामुळे जगभरात हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (Dog steals mic from a reporter during a live)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, मीर टीव्ही (mir24tv) या एका रशियन टेलिव्हिजन न्यूज चॅनेलचा हा व्हिडिओ आहे. या चॅनेलची महिला रिपोर्टर नादिया सेरेझकिना (Nadia Serezhkina) ही हवामानाबाबतची बातमी देत होती. यावेळी तिने हातात बुम माईक पकडले होते आणि ती लाईव्ह रिपोर्टींग करत होती. काही सेकंद बोलल्यानंतर अचानाक एक पाळीव कुत्रा कॅमेऱ्यासमोर आला आणि त्याने या रशियन महिला रिपोर्टरच्या अंगावर उडी मारत तिच्या हातातून माईकच पळवला. यावेळी ती महिला पत्रकार काही सेकंद गोंधळली, पण नेमका प्रकार लक्षात येताच तिने त्या कुत्र्याच्या तोंडातून आपला बुम माईक घेण्यासाठी गेली असता कुत्र्याने पळ काढला. यामुळे नादिया हिलासुद्धा त्या कुत्र्याच्या मागे पळावं लागलं. सजग कॅमेऱ्यामॅनने हे सगळं काही आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. मात्र, हे सगळं लाईव्ह सुरू आहे आणि अख्खा रशिया हे सगळं पाहतोय हे कदातिच तो कॅमेरामन काही क्षणांसाठी विसरला असावा.
फिल्डवरचा रिपोर्टरचा गोंधळ पाहून स्टुडिओत बसलेली महिला अँकर एलिना डॅशकुएवा (Elina Dashkueva) हीदेखील गोंधळून गेली. काय बोलावं हे तिला सुचेनासं झालं. PCR रुममध्ये असलेल्या कंट्रोलरनेही हे सगळं ऑनएअर चालूच ठेवलं. यामुळे अँकर एलिना हिने "असे दिसते की आमचा आमच्या वार्ताहराशी संपर्क तुटला आहे. आम्ही तिच्याशी क्षणोक्षणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू" असं दर्शकांना सांगून टाकलं, तरीही काही सेकंद हे सगळं सुरुच होतं. टीव्ही चॅनेवर लाईव्ह घडलेल्या या प्रसंगामुळे रिपोर्टर, अॅंकर, पीसीआर टीम, इनपुट आणि आउटपुट सगळ्यांची तारांबळ उडाली. प्रेक्षकांनी मात्र या गंमतीशीर घटनेचा पुरेपुर आनंद घेतला. हा व्हिडिओ ३ एप्रिल २०२१ चा असल्याचं बोललं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.