Akshay Baisane | अक्षय बैसाणे
२५ ऑगस्टला लायगर चित्रपट रिलीज झाला, पण चित्रापटापेक्षाही चर्चा होतेय ती म्हणजे या चित्रपटाची निर्माती असलेली चार्मी कौर हिची.
चार्मी कौरचा जन्म १७ मे १९८७ रोजी मुंबईजवळील वसई येथे झाला.
तिचे वडील दीपसिंग भूपत यांचा गोरेगाव पूर्व येथे नट बोल्टचा कारखाना होता.
चार्मी १३ वर्षांची असताना तिला वाटले की, मी काहीतरी काम करावं.
2004 मध्ये तिचा 'श्री अंजनेयम' हा चित्रपट हिट झाला आणि हिट चित्रपटांची मालिका सुरू झाली. आता ती दक्षिणेतील मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
चार्मीने १५ वर्षे अभिनेत्री म्हणून काम केले. त्यानंतर तिने अभिनय करणं सोडलं, तिचा शेवटचा चित्रपट 'ज्योती लक्ष्मी' हा होता जो २०१५ साली आला होता.
दक्षिणेतील जवळपास सर्व भाषांमध्ये ६० चित्रपट केलेल्या चार्मी कौरने हिंदीतही 'बुड्ढा होगा तेरा बाप' आणि 'जिला गाझियाबाद'मध्ये या सिनेमांमध्ये काम केले आहे.
अनन्या आणि विजय देवरकोंडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित झाला.
मात्र चित्रपटापेक्षा जास्त चर्चा होतेय ती म्हणजे चार्मी कौर हिच्या घायळ करणाऱ्या अदा आणि बोल्ड लुकची.