Pune kothrud Accident News 
मुंबई/पुणे

Pune Accident : कोथरूड पुलावर पहाटे दुचाकीचा भीषण अपघात, २ तरूणांचा जागीच मृत्यू

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोथरूडमध्ये पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune kothrud Accident News : पुण्यच्या कोथरूडमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोथरूडमध्ये पुलाच्या कठड्याला दुचाकीने जोरदार धडक दिली, त्यामध्ये चालक आणि पाठीमागे बसलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. कोथरूड येथील पौड फाट्याजवळ पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती निधनाची नोंद केली आहे.

कोथरूड येथील पौड फाट्याजवळ पुलावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. सर्वेश गोपाळ पाटील (वय २०) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दुचाकीस्वार सर्वेश हा त्याचा मित्र पुष्कर याच्यासमवेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पौड फाटा परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावरून निघाला होता. त्यावेळी भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

पुलाच्या कठड्यास धडकल्याने दुचाकीस्वारासह सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कोथरूड येथील पौड फाट्याजवळ पुलावर मंगळवारी पहाटे घडली. सर्वेश गोपाळ पाटील (वय २०) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सर्वेश हा त्याचा मित्र पुष्कर याच्यासमवेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पौड फाटा परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावरून निघाला होता. भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिस अंमलदार निषाद कोंडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार अडागळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुखी संसाराच्या स्वप्नांची क्षणांत राखरांगोळी; १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू

Maharashtra News Live Update: खर्डी – उंबरमळी स्टेशनमध्ये रुळाजवळील कोरड्या गवताला आग

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT