महापालिका निवडणुकीनंतर महत्त्वाचा निर्णय
मुंबईत उभारणार बिहार भवन
पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता
महापालिका निवडणुका झाल्या आहे. मात्र मराठी - अमराठी वाद काही थांबायला तयार नाही. उलट हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे बिहार भवन. बिहारनं मुंबईबाबत एक निर्णय घेला आहे. या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. त्यामुळे आता पुढे अजून वाद वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत उभारणार बिहार भवन (Bihar Bhavan in Mumbai)
मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरु असतानाच मुंबईत बिहार भवन उभारण्याचा मोठा प्लॅन आखण्यात येतो आहे. या निर्णयाला मनसेने जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही असा इशारा मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय. तर भाषा आणि प्रांतवाद केल्यामुळेच मनसेची अशी अवस्था झाल्याचा टोला भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी लगावलाय.
मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे बिहार भवन उभारलं जाणार आहे... यासाठी बिहार सरकारने 314 कोटी 20 लाखांच्या निधीला मंजुरी दिलीये... भवनाची इमारत 30 मजली असून सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे... यात मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय केली जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूक मराठी आणि अमराठी मुद्यामुळे गाजली. आता बिहार भवनाच्या मुद्यामुळे मराठी-परप्रांतीय वाद आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.